एक थेंब पावसाचा हिर...

एक थेंब

पावसाचा

हिरव्या हिरव्या

गवताचा

गाईगुरांच्या

चार्‍याचा.

एक थेंब

पावसाचा

माणिकमोती

पिकण्याचा

तहानभूक

हरण्याचा.

एक थेंब

पावसाचा

कीडमुंगी

जगण्याचा

पानफूल

फुलण्याचा.

एक थेंब

पावसाचा

डोंगरमाथा

भिजण्याचा

दर्याला अंघोळ

घालण्याचा .

एक थेंब

पावसाचा !