Bookstruck

अखंड करती जगतावरती कृपावं...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अखंड करती जगतावरती कृपावंत बरसात,

वृक्ष हे वनदेवीचे हात...

प्राणवायुमय करुनी औक्षण

वृक्ष टाळती घोर प्रदूषण

अवर्षणाचे संकट टळता दुष्काळावर मात...

वृक्ष राखती पर्यावरणा

अभय मिळे अन् वन्य जिवांना

सिमेंट-जंगल आणिक खाणी करिती वाताहात...

झीज भूमीची वृक्ष रोखती

कस मातीचा वृक्ष राखती

वनौषधी, मध, सरपण यांचा सुकाळ नित्य वनात...

एक वृक्ष तरि घ्यावा दत्‍तक

नरजन्माचे होईल सार्थक

वृक्ष वाढवा, विश्‍व वाचवा, हाच मोक्ष साक्षात ...

« PreviousChapter ListNext »