Bookstruck

पंखसुंदर प्रवासी निळ्या आ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पंखसुंदर प्रवासी निळ्या आभाळवाटांचे

किती डौलाचे, रुपाचे, कसे देखण्या थाटाचे !

उभारुन दोन्ही पंख झेपा उंच उंच घेती

आणि भुईची लेकरे थेट आभाळात जाती !

पी, पी, टिटीह टिटीह, चिव चिव, कुहू कुहू

त‍र्‍हेत‍र्‍हेचे हे सूर, किती ऐकू ? काय पाहू ?

चोची करडया, पिवळ्या, डोळे रत्‍नमाणकांचे,

पंख फुटून आनंद जणू भोवताली नाचे !

कसे टिपतात दाणे, कशा वेळावती माना,

गळा फुगवून कुणी घेती सुरेलशा ताना !

अंगणात, रानामध्ये, झाडांवर, नदीकाठी

देवाघरची खेळणी आम्हां छोटया बाळांसाठी

असे भरारते पंख फुटतील का मलाही ?

साद घालते पहा ना आभाळ नि दिशा दाही !

« PreviousChapter ListNext »