रानाच्या दरीत पाखरांची...

रानाच्या दरीत

पाखरांची हाक

वळणाच्या वाटेवर

मनाला धाक

घनगर्द झाडांचं

सळसळे पान

नभातून उमटे

पावसाचं गान

रानाच्या कुशीत

वार्‍याचा जोर

दमून फांदीवर

बसलेला मोर

रानाच्या मातीला

फुलांचा गंध

पावलांना जडे

फिरण्याचा छंद