Bookstruck

रानातल्या रानात हिरव्य...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रानातल्या रानात

हिरव्या पिवळ्या पानात

उडतंय पाखरु -

तळ्यातल्या उन्हात

गळ्यातल्या गाण्यात

डोलतंय पाखरु -

डोंगरच्या वार्‍यात

फुलत्या पिसार्‍यात

नाचतंय पाखरु -

पावसात भिजतंय

तरीही हसतंय

खटयाळ पाखरु -

दिशातून आलं

देशाला निघालं

लबाड पाखरु -

भिरभिर पाखरु

उडतंय छान

भोवती हसतंय

हिरवं रान -

हिरव्या रानात

पिवळं फूल

मनाला घालतंय

मोहक भूल -

भुलले मनात

शिरले रानात

सोनेरी उन्हात

पोपटी पानांत -

पानांना देतो

वारा हूल

त्याला लागलंय

खरंच खूळ.

« PreviousChapter ListNext »