Bookstruck

प्रस्तावना 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
८ अधिष्ठानपारमिता

अधिष्ठान म्हणजे दृढनिश्चय, आणि त्यांत पारंगतता संपादणें याला अधिष्ठानपारमिता म्हणतात. आपण अमुक वेळी अमुक काम करण्याचा निश्चय करतों, आणि आळसामुळें किंवा गप्पागोष्टींच्या आवडीमुळें तो मोडतों. आपला बेत वेळोवेळीं मोडण्याची सवय अंगवळणी पडली म्हणजे मनुष्य पूर्णपणें अव्यवस्थित होतो, व त्याच्या हातून कोणतेंहि काम पार पाडणें मुष्कील होतें. असा मनष्य आत्मोन्नति करून जगाचें कल्याण कसें साधू शकेल ? म्हणून लहान सहान कार्यांतहि तुमचे बेत तंतोतंत पाळण्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. विचारपूर्वक अमुक एक कर्तव्य ठरल्यानंतर त्यांत कितीहि विघ्नें आलीं तरी तें पार पाडण्याचें सामर्थ्य तुम्ही संपादिलें पाहिजे, आणि लहानसहान कार्यांत निश्चयानें वागल्यानें तें तुम्हास सहज संपादतां येण्याजोगें आहे.

« PreviousChapter ListNext »