Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 104

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
८०. प्रसंगावधान.

(सुंसुमारजातक नं. २०८)


बोधिसत्त्व एकदां वानरयोनींत जन्मून गंगेच्या कांठीं एका अरण्यांत रहात होता. गंगेंत एक मोठा मगर रहात असे. त्याची बायको बोधिसत्त्वाला पाहून आपल्या नवर्‍याला म्हणाली, ''स्वामी हा मोठा वानर येथें रहात असतो. यांचें शरीर इतकें सुंदर दिसतें तर त्याचें हृदय किती गोड असेल ? मला तुम्ही त्याचें हृदय आणून द्या. हाच मला डोहाळा झाला आहे.''

मगर म्हणाला, ''भद्रे, आम्हीं जलचर प्राणी आणि वानर पडला स्थलचर; या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारा. तेव्हां त्याचें हृदयमांस आम्हांस कसें मिळेल ? तुझा हा डोहाळा तूं सोडून दे, आणि दुसर्‍या कोणत्या तरी पदार्थावर रुचि ठेव.''

मगरीण म्हणाली, ''हें कांहीं चालावयाचें नाहीं. जर मला या वानराचें हृदय मिळालें नाहीं तर मी जीव देईन.''

निकरावर गोष्ट आली असें पाहून मगर म्हणाला, ''जरा दम धर, थोडा प्रयत्‍न करून पाहतों. युक्तिप्रयुक्तीनें जर त्याला पकडतां आलें तर त्याचें हृदय तुला मिळेल.''

याप्रमाणें बायकोचें समाधान करून बोधिसत्त्व पाणी पिण्यास गंगेवर आला असतां त्याजजवळ येऊन मगर त्याला म्हणाला, ''बा वानरश्रेष्ठा, तूं या फलरहित अरण्यांत कां वास करून आहेस ? गंगेच्या पलीकडे आंबे, फणस, निंबें वगैरे फळें इतकीं विपुल आहेत कीं, तुला तेथें श्रमावांचून मोठ्या चैनीनें रहातां येईल.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''पण मगर महाराज तिकडे जावें कसें ? गंगा पडली विस्तीर्ण आणि खोल, आणि माझ्यासारख्या स्थलचर प्राण्याला ती तरून जातां येणें शक्य नाहीं.''

मगर म्हणाला, ''वा ! माझ्यासारखा बळकट जलचर प्राणी तुमचा मित्र असतां तुम्ही हताश कां होता ? माझ्या पाठीवर बसा म्हणजे मी तुम्हाला पांच चार पळांत परतीरीं नेऊन पोंचवतों.''
« PreviousChapter ListNext »