Bookstruck

धर्म 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
हानिभागि शील:-

योध सेवति दुस्सीले सीलवन्ते न सेवति।
वत्थुवीतिक्कमे दोसं न पस्सति अविद्दसु।।
मिच्छासंकप्प बहुलो इंद्रियानि न रक्खति।
एवरूपस्स वे शीलं जायते हानभागियं।।


जो अविद्वान् मनुष्य पाप्यांचा सहवास करितो आणि शीलवंतांच्या समागमांत राहत नाहीं, जो नियमभंगाची परवा करीत नाहीं, ज्याच्या मनांत विशेषत: पापविचार घोळत असतात, व जो आपल्या इंद्रियांचे रक्षण करीत नाहीं, त्याचें शील हानिभागी होतें.

स्थितिभागि शील:-

यो पनत्तमनो होति सीलसंपत्तिया इध।
कम्मट्ठानानुयोगम्हि न उप्पादेति मानसं।।
तुट्ठस्स सीलमत्तेन अघटन्तस्स उत्तरि।
तस्स तं ठितिभागियं शीलं भवति भिक्खुनो।।


जो कोणी शीलसंपत्तीनें आनंदित होतो, ध्यानसमाधि साध्य करण्याचा विचार करीत नाहीं, जो शीलानेंच संतुष्ट होऊन पुढील प्रयत्न सोडून देतो त्या भिक्षूचें तें शील स्थितिभागी होतें.

संपन्नसीलो घटति समाधत्थाय यो पन।
विसेसभागियं सीलं होति एतस्सभिक्खुनो।।

जो शीलसंपन्न भिक्षू समाधि साधण्यासाठीं प्रयत्न करितो त्यांचे तें शील विशेषभागी होतें.

अतुट्ठो सीलमत्तेन निब्बिदं योनु युंजति।
होति निब्बेद भागियं सीलमेतस्स भिक्खुनो।।

ज्या भिक्षूची केवळ शीलानें तृप्ति होत नाहीं, व जो सतत वैराग्य प्राप्तीच्या प्रयत्नास लागतो, त्याचें तें शील निर्वेदभागी होतें.

हे चार भेद भिक्षूंस उद्देशून सांगितले आहेत. तथापि ते गृहस्थ आणि गृहिणि यांनांहि लागू पडतात. हे व पूर्वींचे तीन भेद येथें सांगण्याचें कारण हेंच कीं, आह्मीं आपलें शील हीन किंवा हानिभागी होऊं न देतां उत्तरोत्तर वरच्या पायरीचें होत जाईल अशाविषयीं प्रयत्न करावा.
« PreviousChapter ListNext »