Bookstruck

सुत्तनिपात 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-


४४ ओरोपयित्वा गिहिब्ञ्ञनानि संसीनपत्तो१ (१ म.-संभिन्न, संछिन्न.) यथा कोविळारो।।
छेत्वान वीरो२  (२ म.-धीरो.) गिहिबंधनानि एको चरे खग्गविसाणकप्पो।।१०।।

४५ सचे लभेय निपकं सहायं सद्धिंचरं साधुविहारि३ (३ अ.-रिं) धीरं।
अभिभुय्य सब्बानि परिस्सयानि चरेय्य तेनऽत्तमनो सतीमा।।११।।

४६ नो चे लभेथ निपकं सहायं सद्धिंचरं साधुविहारि धीरं।
राजा व रट्ठं विजितं पहाय एको चरे खग्गविसाणकप्पो।।१२।।

४७ अद्वा पसंसाम सहायसंपदं सेट्ठा समा सेवितब्बा सहाया।।
एते अलद्वा अनवज्जभोजी४ (४ म.-जि.) एको चरे खग्गविसाणकप्पो।।१३।।

मराठीत अनुवाद :-


४४. पानें गळालेल्या कोविदार वृक्षाप्रमाणें गृहस्थाश्रमाचीं चिन्हें टाकून आणि गृहस्थाश्रमाचीं बन्धनें तोडून शूरानें गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (१०)

४५. जर हुशार, सन्मार्गानें वागणारा व धैर्यंवान् साथी मिळाला, तर सर्व विघ्नें सहन करून स्मृतिमान् राहून आनंदानें त्याजबरोबर राहावें. (११)

४६. जर हुशार, सन्मार्गानें वागणारा व धैर्यंवान् साथी मिळाला नाहीं, तर राजा विजित (दुसर्‍याच्या ताब्यांत गेलेलें) राष्ट्र सोडून जातो, तद्वत् गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (१२)

४७. मित्रंपदेची आम्ही खात्रीनें तारीफ करतों. समानशील किंवा आपणांपेक्षा श्रेष्ठ मित्रांची संगत धरावी. (पण) जर असे साथी मिळाले नाहींत, तर शुद्ध१ (१. शुद्ध अन्न सेवन करणें म्हणजे सदाचारानें वागणें. जो असदाचारी तो कितीही सोंवळें बाळगीत असला, तरी अशुद्धच अन्न खातो.) अन्न सेवन करीत गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (१३)
« PreviousChapter ListNext »