Bookstruck

सुत्तनिपात 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत : -

४८ दिखा सुवण्णस्स पभस्सरानि कम्मारपुत्तेन सुनिट्ठितानि।
संघट्टमानानि१ (१ नि.-संघट्टयन्तानि.) दुवे भुजस्मिं एको चरे खग्गविसाणकप्पो।।१५।।

४९ एवं दुतियेन२ (२ नि.-दुतीयेन.) सहा३ (३ म.-सह.) ममऽस्स वाचाभिलापो अभिसज्जना वा।
एतं भयं आयतिं पेक्खमानो एको चरे खग्गविसाणकप्पो।।१५।।

५० कामा हिं चित्रा मधुरा मनोरमा विरूपरूपेन मथेन्ति चित्तं।
आदीनवं कामगुणेसु दिखा एको चरे खग्गविसाणकप्पो।।१६।।

५१ इति४ (४म.-ईति.) च गण्डो च उपद्दवो च रोगो च सल्लं च भयं च मेतं।
एतं भयं कामगुणेसु दिखा एको चरे खग्गविसाणकप्पो।।१७।।

मराठीत अनुवाद : -

४८. सोनारानें उत्तम रीतीनें तयार केलेलीं सोन्याचीं प्रभासंपन्न दोन कंकणें एका हातांत एकमेकांवर आदळत असलेलीं पाहून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (१४)

४९. याप्रमाणें दुसर्‍यासहवर्तमान राहिल्यास, माझ्याकडून बडबड केली जाईल, किंवा मला त्याची आसक्ति जडेल, हें पुढील आयुष्यक्रमांत भय पाहून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (१५)

५०. कारण पंचेन्द्रियाचे विषय विचित्र, मधुर आणि मनोरम आहेत, ते नानाप्रकारें मनुष्याचें चित्त मंथन करतात. विषयांमध्यें असलेला हा दोष पाहून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (१६)

५१. मजवर हें संकट आहे, हा गंड आहे, हा उपद्रव आहे, हा रोग आहे, शल्य आहे, भय आहे-याप्रमाणें (पंचेंद्रियांच्या) विषयांत भय पाहून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (१७)
« PreviousChapter ListNext »