Bookstruck

सुत्तनिपात 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

५२ सीतं च उण्हं च खुदं१ (१ म.-खुद्दं.) पिपासं वातातपे डंससिरिंसपे च।
सब्बानिऽपेतानि अभिसंभवित्वा एको चरे खग्गविसाणकप्पो।।१८।।

५३ नागो व यूथानि विवज्जयित्वा संजातखन्धो पदुमी उळारो।
यथाभिरन्तं विहरे२ (२ म.-विहरं.) अरञ्ञे एको चरे खग्गविसाणकप्पो।।१९।।

५४ अट्ठान३ (३ म.-अट्ठानं.) तं संगणिकारतस्स यं फस्सये४ (४ म.-यं पस्सये नि.-फु.) सामयिकं५ (५ म.-समायिकं.) विमुत्तिं।
आदिच्चबंधुस्स वचो निसम्म एको चरे खग्गविसाणकप्पो।।२०।।

५५ दिट्ठिविसूकानि६ (६ म.-विसुकानि.) उपात्तिवत्तो पत्तो नियामं पटिलद्धमग्गो।
उप्पन्नञाणोऽम्हि७ (७ म.-णऽम्हि.) अनञ्ञमेय्यो एको चरे खग्गविसाणकप्पो।।२१।।

मराठीत अनुवाद :-

५२. शीत, उष्ण, तहान, भूक, ऊन, वारा, डांस, साप-हे सर्व (क्लेश) सहन करून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (१८)

५३. जसा पद्मकुळांत जन्मलेल्या भव्य खांद्याचा मोठा हत्ती यूथ सोडून अरण्यांत यथेच्छ संचार करतो, त्याप्रमाणें गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (१९)

५४. मंडळींत सुख मानणार्‍याला (समाधिलाभानें प्राप्त होणारी) क्षणिक विमुक्ति मिळेल हें अशक्य आहे. (म्हणून) आदित्यबन्धूचें (बुद्धाचें) वचन ऐकून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (२०)

५५. मी विषम संप्रदायाच्या पार गेलों आहें, मी न्याय्य पथावर आलों आहें, (खरा) मार्ग मला मिळाला आहे, मला ज्ञान उत्पन्न झालें आहे, इतरांनीं समजावण्याची आतां जरूरी राहिली नाहीं, असें जाणून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (२१)
« PreviousChapter ListNext »