Bookstruck

सुत्तनिपात 66

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

३२५ वद्वापचायी१(१ म.-वुद्धापचायी.) अनुसुय्यको सिया। कालञ्ञू चऽस्स गुरूनं दूस्सनाय
धम्मिं कथं एरयितं खणञ्ञू। सुणेय्य सक्कच्च सुभासितानि।।२।।

३२६ कालेन गच्छे गरूनं सकासं। धमं निरंकत्वा निर्वातवुत्ति।
अत्थं धम्मं संयमं ब्रह्मचरियं। अनुस्सरे चेव समाचरे च।।३।।

३२७ धम्मारामो धम्मरतो। धम्मे ठितो धम्मविनिच्छयञ्ञू।
नेवाचरे धम्मसन्दोसवादं। तच्छेहि नीयेथ सुभासितेहि।।४।।

३२८ हस्सं जप्पं परिदेवं पदोसं। मायाकतं कुहनं गिद्धिमानं।
सारभ्भ-कक्कस्स कसाव-मुच्छं। हित्वा चरे वीतमदो ठितत्तो।।५।।

मराठीत अनुवाद :-

३२५. त्यानें वडील माणसांना मान द्यावा, आणि ईर्ष्याविरहित व्हावें. गुरूंच्या भेटीची वेळ जाणावी, आणि सन्धि न दवडतां आदरपूर्वक (गुरूंच्या मुखांतून) बाहेर पडलेलें धार्मिक संभाषण व सुभाषितें ऐकावींत. (२)

३२६. गर्व दूर सारून व नम्र होऊन योग्य वेळीं गुरूंपाशीं जावें; सदर्थ, धर्म, संयम व ब्रह्मचर्य यांचें स्मरण ठेवावें व तीं आचरणांत आणावींत. (३)

३२७. धर्माराम, धर्मरत, धर्मस्थित व धर्मन्यायज्ञ होऊन धर्माला दोष लागेल अशा वादांत पडूं नयें; यथातथ्य सुभाषितांचीच कास धरून (वादाचा निकाल लावाला)१. (१. या गाथेचा टीकाकारानें निराळाच अर्थ केला आहे. समाधि-विपश्यनादि पारिभाषिक शब्दांशी अर्थ जोडला आहे.) (४)

३२८. हास्य, बडबड, शोक, प्रद्वेष, माया, दंभ, अतिलोभ, अहंकार, विरोधप्रियता२, (२ अ.- पच्चनीकसातता....) कर्कशता, अपवित्रता आणि हांव सोडून वीतमद आणि स्थितात्मा व्हावें. (५)
« PreviousChapter ListNext »