Bookstruck

सुत्तनिपात 67

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

३२९. सुभाषितांचे ध्येय ज्ञान, श्रुताचें आणि ज्ञानाचें ध्येय समाधि होय. जो मनुष्य आळशी आणि प्रमादी होतो, त्याची प्रज्ञा व विद्या वाढत नाही.  (६)

३३०. आर्यप्रवेदित धर्मांत जे रत होतात, ते कायेंनें, वाचेनें आणि कर्मानें श्रेष्ठ होत. ते शान्तीनें, समाधानानें आणि समाधियुक्त राहणारे असून त्यांनी विद्येचें आणि प्रज्ञेचें सार जाणलेलेंच आहे.  (७)

किंसीलसुत्त समाप्त

२२
[१०. उट्ठानसुत्त]


३३१. उठा !(जागे व्हा! ) बसा ! झोंपेपासून तुम्हांस काय फायदा होणार आहे ? बाणाचें शल्य तुमच्या शरिरांत शिरल्यामुळें दु:ख भोगणार्‍या तुम्हां पीडित जानांना निद्रा कशी येते?( १)     

३३२. उट्ठह्थ निसीदथ दळ्हं सिक्खथ सन्तिया |
मा वो पमत्ते विञ्ञाय (मच्चुराजा) अमोहयित्थ वासानुगे ||२||

३३३. याय देवा मनुस्सा च सिता तिट्ठन्ति अत्थिका |
तरथेतं विसत्तिकं खणो वे मां उपच्चगा |

३३४.  पमादो रजो पामा१(१ सी.- पमादा.)दो पमादानुपतितो रजा |
अप्पमादेन विज्जाय अब्बहे सल्लमत्तनो ति ||४||

उट्टानसुत्तं निट्ठितं |

मराठीत अनुवाद :-

३३२. उठा !  जागो व्हा !) बसा ! निश्चयानें शांतीचा अभ्यास करा. तुम्हांस बेसावध झालेले पाहून आपल्या कबजांत घेऊन मृत्युराजा (मार) तुम्हांस मोह न पडो !  (२)

३३३. जिच्यामुळें देव आणि मनुष्य आशाळभूत होऊन राहतात, त्या तृष्णेचें उल्लंघन करा. हा क्षण वायां दवडूं नका ! कारण क्षण वायां दडवणारे नरकांत पडून शोक करतात.  (३)

३३४. प्रमाद हे मळ होय; प्रमादापासून मळ उत्पन्न होतो. अप्रमादानें आणि प्रज्ञेनें आपल्या शरिरांतील शल्य काढावें). (४)

उट्ठानसुत्त समाप्त
« PreviousChapter ListNext »