Bookstruck

सुत्तनिपात 178

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

८९१ अञ्ञं इतो याभिवदन्ति धम्मं। अपरद्धा सुद्धिमकेवेलीनो१। (१ लि.-सुद्धिमकेवली ते.)
एवं हि तिथ्या पुथुसो वदन्ति। संदिट्ठिरागेन हि तेऽभिरत्ता२।।१४।। (२ नि.-त्याभिरता.)

८९२ इधेव सुद्धि इति वादियन्ति३। नाञ्ञेसु धम्मेसु विसुद्धिमाहु। (३नि.-वादयन्ति.)
एवंऽपि तिथ्या पुथुसो निविट्ठा। सकायने तत्थ दळ्हं वदाना।।१५।।

८९३ सकायने चापि दळ्हं वदाना। कमेत्थ४ बालो ति परं दहेय्य। (४ नि.-कं तत्थ.)
सयमेव५ सो मेधकं५ आवहेय्य। परं वदं बालमसुद्धधम्मं६।।१६।। (५-५ नि.-सयं व सो मेधगं.) (६ रो-बालामसुद्धिधम्मं.)

८९४ विनिच्छये ठत्वा सयं पमाय। उद्धं सो लोकस्मिं विवादमेति।
हित्वान सब्बानि विनिच्छयानि। न मेधकं कुरुते७ जन्तु लोके।।१७।। (७नि.-न मेधरां कुब्बति.)

चूळवियूहसुत्तं ८ निट्ठितं। (८ म.-चूळब्यूहसुत्तं.)

मराठी अनुवाद :-

८९१ ‘जे माझ्या पंथाहून भिन्न धर्म प्रतिपादितात, ते शुद्धीच्या उलट जातात, व ते केवली नव्हत,’ असें सांप्रदायिकपंथी परस्परांना म्हणतात. कां कीं, ते स्वसंप्रदायाच्या लोभानें लुब्ध होतात. (१४)

८९२ ‘याच पंथांत शुद्धि’ असें ते प्रतिपादितात, व ‘इतर पंथांत शुद्धि नाहीं’ असें म्हणतात. याप्रमाणें आपल्याच पंथाचें दृढ समर्थन करणारे सांप्रदायिकपंथी भिन्न भिन्न मतांत निविष्ट होतात. (१५)

८९३ आपल्याच पंथाचें दृढ समर्थन करणार्‍यांत एक दुसर्‍या कोणाला मूर्ख ठरवूं शकेल? दुसर्‍याला जर तो अशुद्धधर्मी मूर्ख म्हणूं लागला, तर तो स्वत:च आपणावर वाद ओढवून घेईल. (१६)

८९४ तो ठाम मत करून घेतो व स्वत:च अनुमान करून तदनंतर लोकांशीं वाद करतो. पण जो प्राणी सर्व ठाम मतें सोडून देतो, तो लोकांशीं वाद करीत नाहीं. (१७)

चूळवियूहसुत्त समाप्त
« PreviousChapter ListNext »