Bookstruck

सुत्तनिपात 179

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पाली भाषेत :-

५१
[१३. महावियूहसुत्तं]

पाली भाषेत :-


८९५ ये केचि मे दिट्ठिपरिब्बसाना। इदमेव सच्चं ति विवादियन्ति।
सब्बे व ते निन्दमन्वानयन्ति। अथो पसंसंऽपि लभन्ति तत्थ।।१।।

८९६ अप्पं हि एतं न अलं समाय। दुवे विवादस्स फलानि ब्रूमि।
एवंऽपि दिस्वा न विवादियेथ१। खेमाभिपस्सं अविवादभूमिं।।२।। (१ एतं पि दिस्वा न विवादयेथ.)

८९७ या काचि मा सम्मुतियो पुथुज्जा। सब्बा व एता न उपेति विद्वा।
अनूपयो सो उपयं किमेय्य। दिट्ठे सुते खन्तिमकुब्बमानो।।३।।

५१
[१३. महावियूहसुत्त]

मराठीत अनुवाद :-

८९५ जे कोणी सांप्रदायिक मतांना अनुसरणारे आपलें तेवढें सत्य असें प्रतिपादन करतात, ते सर्व निन्देला पात्र होतात, आणि (कधीं कधीं) प्रशंसाही मिळवितात. (१)

८९६ (निन्दा व स्तुति) हीं दोन विवादाचीं फळें असें मी म्हणतों. पण अशा क्षुद्र गोष्टी उपशमाला कारणीभूत होत नसतात. या रीतीनें विचार करून ‘अविवादभूमि कल्याणप्रद आहे’ असें जाणणार्‍यानें वादांत पडूं नये. (२)

८९७ हीं जीं सामान्य लोकांचीं मतें आहेत, तीं सर्व विद्वान् स्वीकारीत नाहीं. दृष्ट आणि श्रुत यांत आवड उत्पन्न न करणारा निश्चळ असा तो चंचळ कसा होईल? (३)
« PreviousChapter ListNext »