Bookstruck

सुत्तनिपात 187

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

९४२ निद्दं तन्दिं सहे थीनं पमादेन न संवसे।
अतिमाने न तिट्ठेय्य निब्बाणमनसो नरो।।८।।

९४३ मोसवज्जे न निय्येथ रूपे स्नेहं न कुब्बये।
मानं च परिजानेय्य साहसा विरतो चरे।।९।।

९४४ पुराणं नाभिनन्देय्य नवे खन्ति१ न कुब्बये। (१ नि.-खन्तिमकुब्बये.)
हीयमाने२ न सोचेय्य आकासं न सितो सिया।।१०।। (२ नि.-हिय्यमाने.)

९४५ गेधं ब्रूमि महोघो ति आजवं३ ब्रूमि जप्पनं। (३ नि.-आचमं.)
आरम्मणं पकप्पनं कामपंको दुरच्चयो।।११।।

मराठीत अनुवाद :-

९४२ निर्वाणाभिरत माणसानें निद्रा, तन्द्री आणि अनुत्साह यांजवर जय मिळवावा, बेसावधपणें राहूं नये आणि अतिमान करूं नये. (८)

९४३ त्यानें खोटेपणानें वागूं नये, रूपाचा स्नेह धरूं नये, अहंकार जाणून सोडून द्यावा व साहसापासून विरत होऊन रहावें. (९)

९४४ त्यानें अतीत वस्तूबद्दल आनंद मानूं नये. नव्या वस्तूंत आवड उत्पन्न करूं नये, व तिचा नाश होत असतां खेद करूं नये; आणि आकाशासारख्या१ (१ टीकाकार ‘तृष्णा’ असा अर्थ करतो. व पुढील गाथेंतील गेध, महोघ, आजव, जप्पन वगैरे शब्द तृष्णेचेच पर्यायवाचक असें म्हणतो.) (शून्य पदार्थावर) अवलंबून राहूं नये. (१०)

९४५ (या संसारांत) लुब्धता हा महौघ, याञ्चा म्हणजे यांत वाहून जाणें (आजव), विकल्प हें अवलंबन आणि कामसुख हा दुस्तर चिखल असें मी म्हणतो. (११)

पाली भाषेत :-

९४६ सच्चा अवोक्कम्म१ मुनि थले तिट्ठति ब्राह्मणो। (१ नि.-अवोक्कमं.)
सब्बं सो पटिनिस्सज्ज स वे२ सन्तो ति वुच्चति।।१२।। (२ नि.-चे.)

९४७ स वे२ विद्वा स वेदगु ञत्वा धम्मं अनिस्सितो।(२ नि.-चे.)
सम्मा सो लोके इरियानो न पिहंतीध कस्सचि।।१३।।

९४८ यो ध कामे अच्चतरि संगं लोके दुरच्चयं।
न सो सोचति नाज्झेति छिन्नसोतो अबन्धनो।।१४।।

९४९ यं पुब्बे तं विसोसेहि पुच्छा ते माऽहु किञ्चनं।
मज्झे वे२ नो गहेस्ससि उपसन्तो चरिस्ससि।।१५।।(२ नि.-चे.)

मराठीत अनुवाद :-

९४६ (त्यांतून) तो मुनि-ब्राह्मण-सत्याला धरून आणि बाकी सर्व सोडून (निर्वाण-) तीरावर येतो. तोच शान्त म्हटला जातो. (१२)

९४७ जो धर्म जाणून अनाश्रित होतो, तोच खरा विद्वान् व तोच वेदपारग होय. तो जगांत सम्यक्-रीतीनें वागून कशाचीही स्पृहा करीत नाहीं. (१३)

९४८ या जगांत जो दुस्तर संग आणि कामोपभोग अतिक्रमून गेला तो, प्रवाहाच्या पार गेलेला, व बन्धनापासून मुक्त झालेला, शोक करीत नाहीं आणि लुब्ध होत नाहीं. (१४)

९४९ जें जुनें तें शोषून टाक; भविष्यकालासाठीं कांहीं राहूं देऊं नकोस. आणि जर तूं वर्तमानकाळालाही पकडून बसणार नाहींस तर उपशांत होऊन फिरत राहशील. (१५)
« PreviousChapter ListNext »