Bookstruck

सुत्तनिपात 188

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

९५० सब्बसो नामरूपस्मिं यस्स नत्थि ममायितं।
असता च न सोचति स वे१ लोके न जिय्यति।।१६।। (१ नि.-चे )

९५१ यस्स नत्थि इदं मे ति परेसं वाऽपि किञ्चनं।
ममत्तं सो असंविन्दं नत्थि मे ति न सोचति।।१७।।

९५२ अनिट्ठुरी अननुगिद्धो अनेजो सब्बधीसमो।
तमानिसंसं पब्रूमि पुच्छितो अविकम्पिनं।।१८।।

९५३ अनेजस्स विजानतो नत्थि काचि निसंखिति।
विरतो सो वियारंभा खेमं पस्सति सब्बधि।।१९।।

मराठीत अनुवाद :-

९५० नामरूपांमध्यें ज्याला सर्वथा ममत्व नाहीं, आणि जो नसलेल्या वस्तूंबद्दल शोक करीत नाहीं, तोच या लोकीं जीर्ण होत नाहीं. (१६)

९५१ ज्याला कोणत्याही वस्तूंसंबंधीं ‘ही माझी’ किंवा ‘ही इतरांची’ असें वाटत नाहीं व ज्याला ममत्वाची वेदना नाहीं, तो ‘ही माझी वस्तु नष्ट झाली’ असें म्हणून शोक करीत नाहीं. (१७)

९५२ मला जर कोणी ‘अविकंपित माणूस कसा असतो’ असा प्रश्न करील, तर मी म्हणेन कीं, जो अनिष्ठुर, अलुब्ध, अकंप्य आणि सर्वत्र समान-भावानें वागणारा-अशा (चारही) गुणांनीं युक्त तो. (१८)

९५३ निर्भय आणि जाणत्या माणसाला कोणतीच वासना राहत नाहीं. तो कर्मा-(निसंखिति) पासून विरत होतो, व सर्वत्र क्षेम पाहतो. (१९)

पाली भाषेत :-

९५४ न समेसु न ओमेसु न उस्सेसु वदते मुनि।
सन्तो सो वीतमच्छरो नादेति न निरस्सती ति (भगवा ति)।।२०।।

अत्तदण्डसुत्तं निट्ठितं।

मराठीत अनुवाद :-

९५४ तो मुनि आपली समानांत, हीनांत किंवा उत्तमांत गणना करून वाद करीत नाहीं. वीतमत्सर व शांत असा तो आदानहि करीत नाहीं व त्यागही करीत नाहीं (असें भगवान् म्हणाला). (२०)

अत्तदण्डसुत्त समाप्त
« PreviousChapter ListNext »