Bookstruck

सुत्तनिपात 216

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

६३
[९. हेमकमाणवपुच्छा (८)]


१०८४ ये मे पुब्बे वियाकंसु (इच्चायस्मा हेमको) हुरं गोतमसासना१ (१ सी.- नं, Fsb.— [ हुरं गोतमसासनं ] ) इच्चासि इति भविस्सति।
सब्बं तं इतिहीतिहं। सब्बं तं तक्कवड्ढनं।।१।।

६३
[९. हेमकमाणवपुच्छा (८)]


मराठीत अनुवाद :-

१०८४ गोतमाच्या उपदेशापूर्वीं — असें आयुष्मान् हेमक म्हणाला - ‘हें असें होतें आणि हें असें होईल,’ असा जो मला उपदेश करीत, तो सर्व परंपरेनें आलेला, तो सर्व तर्क वाढविणारा होता. (१)

पाली भाषेत :-


१०८५  नाहं तत्थ अभिरमिं१ (१ Fsb.-[नाहं तत्थ अभिरमिं.] )
त्वं च मे धम्ममक्खाहि तण्हानिग्घातनं२ (२ सी.-तण्हाय नि, म.-निघातनं.) मुनि।
यं विदित्वा सतो चरं तरे लोके विसत्तिकं।।२।।

१०८६ इध दिट्ठसुतमुतविञ्ञातेसु३(३ सी.-दिट्ठसुतं मुतं वि, Fsb. मुतं. [ विञ्ञातेसु.] ) पियरूपेसु हेमक। 
छन्दरागविनोदनं निब्बाणपदमच्चुतं।।३।।

१०८७ एतदञ्ञाय ये सता४(४ म.-सिता.) दिट्ठधम्माभिनिब्बुता।
उपसन्ता च ते५(५-६ सी.- ते दसा, म.- ये सता.) सदा६(६ नि. - [ सदा = सब्बदा ] )तिण्णा लोके विसत्तिकं ति।।४।।

हेमकमाणवपुच्छा निट्ठिता ।

मराठीत अनुवाद :-

१०८५ त्यांत मला आनंद वाटला नाहीं. पण, हे मुने, ज्याचें ज्ञान मिळवून, स्मृतिमान् होऊन वागणारा या जगीं तृष्णेच्या पार जातो, असा तृष्णेचा नाश करणारा धर्म तूं मला सांग.(२)

१०८६ (भगवान् -) हे हेमका, या जगांत दृष्ट, श्रुत, अनुमित आणि विज्ञात, अशा ज्या प्रिय वस्तू आहेत, त्यांचा छंद आणि लोभ सोडून देणें, हें अच्युत निर्वाणपद होय. (३)

१०८७ असें जाणून जे स्मृतिमान् याच जन्मीं निर्वाण पावतात, ते सदोदित शान्त राहून जगांत तृष्णेच्या पार जातात. (४)

हेमकमाणवपुच्छा समाप्त
« PreviousChapter ListNext »