Bookstruck

सुत्तनिपात 222

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पाली भाषेत :-

११०७ १(१ सी.-उपेखा.) उपेक्खासतिसंसुद्धं धम्मतक्कपुरेजवं।
अञ्ञाविमोक्खं पब्रूमि अविज्जाय पभेदनं।।३।।

११०८ २(२म.-कि.)किं-सु-संयोजनो लोको किं सु तस्स विचारणं३(३सी., म., Fsb.-णा,णो.)। 
किस्सऽस्स विप्पहानेन निब्बाणं इति वुच्चति।।४।।

११०९ ४( ४म.- नन्दि )नन्दीसंयोजनो लोको वितक्कस्स विचारणा५(५म.- णा, णो.)। 
तण्हाय विप्पहानेन निब्बाणं इति वुच्चति।।५।।

१११० कथं सतस्स चरतो६(६सी.- सरतो.) विञ्ञाणं उपरुज्झति।
भगवन्तं७ ( ७म., Fsb.-भवन्तं ) पुट्ठुमागम्म८(८नि.-मागम्हा.) तं सुणोम वचो तव।।६।।

मराठीत अनुवाद :-

११०७ उपेक्षेनें आणि स्मृतीनें शुद्ध झालेला, आणि ज्याच्या आरंभीं धार्मिक वितर्क जोरदार असतो, असा अविद्येचा भेद करणारा व प्रज्ञेनें जो मिळविलेला असतो तो विमोक्ष, असें मी म्हणतों. (३)

११०८ जगाचें संयोजन कोणतें? ते कशामुळें १चालूं (१ निद्देस—इमेहि वितक्केहि लोको चरति, विचरति, पटिचरति.) राहतें? आणि कशाच्या नाशानें त्याला निर्वाण मिळतें? (४)

११०९ लोभ जगाचें संयोजन होय; वितर्कामुळें तें २चालूं (२ निद्देस व त्यावरील टाकेला अनुसरून हा अर्थ दिला आहे.) राहते; आणि तृष्णेचा नाश झाला म्हणजे त्याला निर्वाण असें म्हणतात.(५)

१११०. कशा रीतीनें वागल्यानें स्मृतिमान् माणसाच्या विज्ञानाचा निरोध होतो, हें भगवंताला विचारण्याकरितां आम्ही आलों आहोंत. त्यावर तुझें उत्तर कोणतें, तें आम्ही ऐकूं इच्छितों. (६)

पाली भाषेत :-

११११ अज्झत्तं च बहिद्धा च वेदनं नाभिनन्दतो।
एवं सतस्स चरतो विञ्ञाणं उपरुज्झती ति।।७।।

उदयमाणवपुच्छा निट्ठिता।

मराठीत अनुवाद :-

११११ आध्यात्मिक आणि बाह्य वेदनेचें जो स्मृतिमान् अभिनंदन न करतां वागतो, त्याचें विज्ञान निरोध पावतें. (७)

उदयमाणवपुच्छा समाप्त
« PreviousChapter ListNext »