Bookstruck

सुत्तनिपात 223

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पाली भाषेत :-

६९
[१५. पोसालमाणवपुच्छा (१४)]


१११२ यो अतीतं आदिसति१ (१ म.-आदिस्सति.)(इच्चायस्मा पोसालो) अनेजो छिन्नसंसयो।
पारगुं सब्बधम्मानं अत्थि पञ्हेन आगमं।।१।।

६९
[१५. पोसालमाणवपुच्छा (१४)]

मराठीत अनुवाद :-


१११२ जो पूर्व जन्म सांगू शकतो — असें आयुष्मान् पोसाल म्हणाला — जो अप्रकंप्य, ज्याचे संशय नष्ट झाले, व जो सर्व धर्मांत पारंगत — अशापाशीं मी प्रश्न विचारण्याच्या इच्छेनें आलों आहें. (१)

पाली भाषेत :-

१११३ विभूतरूपसञ्ञिस्स सब्बकायप्पहायिनो१(१ म.- पहायिनो.)। 
अज्झत्तं च बहिद्धा च नत्थि किञ्ची ति पस्सतो।
ञाणं सक्कानुपुच्छामि कथं नेय्यो तथाविधो।।२।।

१११४ विञ्ञाणट्ठितियो सब्बा (पोसाला ति भगवा) अभिजानं तथागतो।
तिट्ठन्तमेनं जानाति विमुत्तं तप्परायणं।।३।।

१११५ आकिञ्चञ्ञासंभवं२(२ बु.-आकिञ्चञ्ञ ) ञत्वा ३ (३म.-नन्दिं.)नन्दी संथोजनं इति।
एवमेवमाभिञ्ञाय४(४म.- एवमेत.) ततो तत्थ विपस्सति।
( ५म.- एवं  )एतं ञाणं तथं तस्स६( ६सी.- तत्थ ) ब्राह्मणस्स वुसीमतो ति।।४।। 

पोसालमाणवपुच्छा निट्ठिता।

मराठीत अनुवाद :-


१११३ ज्यानें रूपसंज्ञांचा अतिक्रम केला, व सर्व देहबुद्धि सोडली आणि जो, अभ्यंतरीं किंवा बाह्य, कोणतीही वस्तु नाहीं असें पाहतो, त्याला ज्ञान कोणतें मिळतें व तो कशा रीतीने जाणला जातो हें, हे शाक्या, मी तुला विचारतों. (२)

१११४ विज्ञानाच्या सर्व पायर्‍या जाणणारा- हे पोसाला, असें भगवान् म्हणाला - तथागत ‘असा माणूस कोणत्या पायरीवर राहून व तत्परायण होऊन विमुक्त झाला आहे’ हें जाणतो. (३)

१११५ त्या पायरीवर असलेल्या माणसानें आपला जन्म आकिंचन्यलोकीं होण्याचा (धोका) आहे आणि तत्संबंधीची वाञ्छा संयोजनकारक आहे, असें जाणून तिची (अनित्यादिक लक्षणांच्या योगें) भावना (विपश्यना) करावी. (अशा रीतीनें भावना करणार्‍या) त्या कृतकृत्य ब्राह्मणाला जें अर्हत्त्वाचें ज्ञान प्राप्त होतें तें यथार्थ ज्ञान होय१. (१ निद्देस व त्यावरील टीकेला अनुसरून हा अर्थ दिला आहे.) (४)

पोसालमाणवपुच्छा समाप्त
« PreviousChapter ListNext »