Bookstruck

बकरे, मेंढे आणि लांडगे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा काही कारणावरून बकरे व मेंढे यांची मोठी लढाई जुंपली आणि फारच रक्तपात झाला. तेव्हा काही लांडग्यांनी आपल्या मध्यस्थीने त्यांचा तंटा मिटविण्याचा विचार केला व युद्धाच्या जागी येऊन दोन्ही पक्षात तो विचार कळविला. तेव्हा त्या दोन्ही पक्षाकडील मंडळी एकदम ओरडून लांडग्यांना म्हणाली, 'सद्‌गृहस्थ हो ! तुमचा हेतू फार चांगला आहे यात संशय नाही. परंतु तुमच्या मध्यस्थीने आमचा तंटा मिटण्यापेक्षा आम्ही सगळे लढाईत मरून गेलो तरी हरकत नाही.'

तात्पर्य

- एकाच जातीच्या किंवा एकाच घराण्यातल्या लोकांत काही कारणाने कलह उत्पन्न झाला, तर तो मोडण्याच्या कामी आपल्या शत्रूचे सहाय्य त्यांनी कधीही घेऊ नये, कारण त्यामुळे 'दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ' असा प्रकार होण्याचीच शक्यता असते.

« PreviousChapter ListNext »