Bookstruck

आंधळा व लांडग्याचे पोर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका गावात एक अंधळा राहात असे. तो कोणत्याही प्राण्याला हात लावून त्याची जात ओळखण्यात फार प्रसिद्ध होता. एकदा एका माणसाने एक लांडग्याचे पिलू त्याच्याकडे परीक्षेसाठी आणले. अंधळ्याने त्याला जवळ घेऊन अंग चाचपून पाहिले, पण त्याची नीट परीक्षा त्याला झाली नाही. मग तो थट्टेने त्या लांडग्याच्या पोराला म्हणाला, 'अरे, तू कुत्र्याचं पिलू आहेस की लांडग्याचं हे मी खात्रीपूर्वक सांगू शकलो नाही, तरी तुला मेंढराच्या कळपात सोडण्याचा सल्ला मी कधीही देणार नाही !'

तात्पर्य

- गाढवाचे पोर गोजिरवाणे दिसले तरी त्याचा गाढवपणा कधीही लपत नाही.

« PreviousChapter ListNext »