Bookstruck

वाघ आणि कुत्रा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एक लबाड कुत्रा रस्त्याने चालला असता वाटेने त्याला एक वाघ भेटला. त्याने पूर्वी वाघ पाहिला नव्हता, तरी पण त्या वाघाला त्याने मोठ्या धीटपणे हाक मारली व त्याच्याबरोबर चालण्याची इच्छा प्रकट केली. तो वाघ त्या वेळी खुषीत असल्याने त्याने कुत्र्याला आपल्याबरोबर चालण्याची परवानगी दिली. मग निरनिराळ्या विषयांवर वादविवाद करत ते चालले असता त्यांना वाटेत एक गाव लागले. त्या गावातले जे जे कुत्रे दिसत त्यांच्यावर वाघ विनाकारण तुटून पडू लागला. ते पाहून आपल्या कुत्र्यांचे रक्षण करण्यासाठी गावातले लोक बडगे घेऊन वाघ व कुत्रा यांच्यावर तुटून पडले व वाघाबरोबर त्या कुत्र्यालाही त्यांनी चांगलेच बडवून काढले. त्याचे कारण इतकेच की, तो त्या वाघाबरोबर होता.

तात्पर्य

- घाईघाईने आणि अविचाराने कोणत्याही माणसाची संगत धरू नये. कारण तो जर दुष्ट असला तर दुष्टपणाचे प्रायश्चित्त त्याच्याबरोबर त्याच्या सोबत्यालाही भोगावे लागते.

« PreviousChapter ListNext »