Bookstruck

मधमाशी आणि कोकिळा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक मधमाशी आपल्या पोळ्यातून बाहेर येऊन जवळच्या एका झाडावर बसून गात असलेल्या कोकिळेस म्हणाली, 'बाई, तू आपलं हे कंटाळवाणं गायन आता बंद कर. पुन्हा पुन्हा सारखं 'कुहू कुहू' करून ओरडत राहण्यात तुला एवढा काय आनंद मिळतो !' तेव्हा कोकिळा मधमाशीला म्हणाली, 'बाई ग, माझ्या गाण्याला तू नावं ठेवतेस म्हणजे नवलच. खरं पाहता तू जी मधाची पोळी तयार करतेस, त्यात जशी कोणत्याच प्रकारची विविधता नसते, त्याचप्रमाणे माझ्या गायनातही ती नाही. कारण मला फक्त एकच स्वर देवाने दिला आहे.' माशी त्यावर म्हणाली, 'तू म्हणतेस ते खरं, पण ज्या व्यवहारोपयोगी कला आहेत त्यात विविधता नसली तरी चालते, पण गाण्यासारख्या केवळ मनोरंजक कलेचं तसं नाही. त्यात विविधता असली पाहिजे, कारण तिच्या अभावी त्या कला कंटाळवाण्या झाल्याशिवाय राहात नाहीत.'

« PreviousChapter ListNext »