Bookstruck

नाचणारी माकडे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका राजाने माकडांस नाचायला शिकविण्याची शाळा काढली व त्यात बर्‍याच माकडांना चांगल्या शिक्षकाकडून नृत्यकलेचे शिक्षण दिले. शिक्षण पुरे झाल्यावर त्या माकडांना चांगल्या पोषाखाने नटवून रंगभूमीवर आणून त्यांचे नृत्य करण्याचा राजाने हुकूम दिला. त्याप्रमाणे ती माकडे नृत्यात अगदी दंग झाली असता प्रेक्षकांपैकी एकाने थोडेसे हरबरे रंगभूमीवर फेकले. ते पाहताच आपले नाचणे थांबवून माकडांनी ते वेचून खाण्याचा सपाटा चालविला व एकमेकांशी मारामारी करून मोठा गोंधळ उडवून दिला.

तात्पर्य

- वाटेल तेवढे शिक्षण दिले तरी कोणाचाही मूळचा स्वभाव पालटणे फार कठीण आहे.

« PreviousChapter ListNext »