Bookstruck

आंधळी मेंढी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका मेंढीचे म्हातारपणामुळे डोळे गेले. तेव्हा 'पक्ष्यांचा राजा गरुड याचा मी नेत्र वैद्य आहे' अशा बढाई मारणार्‍या एका घुबडाने तिचे डोळे बरे करण्याचे कबूल केले. मेंढीच्या डोळ्यांवर शस्त्रप्रयोग करायचे दिवशी सगळीच घुबडे आपली हत्यारे घेउन मेंढीजवळ आली. शस्त्रप्रयोगाची सर्व तयारी झाल्यावर मेंढीने घुबडाला विचारले, 'माझे डोळे बरे करण्याचं सर्व साहित्य तयार आहे ना ?' 'होय, सर्व सामग्री व औषधं अगदी तयार आहेत.' घुबड म्हणाले. मेंढी म्हणाली, 'तुझ्या शस्त्रांचा उपयोग या कामी फार थोडा आहे. मला जे काय पाहिजे आहे ते दुसरंच आहे. पण तू मला अगोदर हे सांग की, जग कसं काय चाललं आहे ?' घुबडानं उत्तर दिलं, 'तुझी दृष्टी जाण्यापूर्वी जग जसं चालत होतं, तसंच ते आत्ताही चालतं आहे.' मेंढी त्यावर लगेच म्हणाली, 'असं असेल तर तू माझ्या डोळ्यांवर मुळीच शस्त्रप्रयोग करू नकोस कारण, जगात ज्या भयंकर अन् वाईट गोष्टी मी आजपर्यंत पाहात आले, त्याच पुढे जन्मभर पाहात बसण्याची माझी मुळीच इच्छा नाही.'

« PreviousChapter ListNext »