Bookstruck

कुत्रा आणि कोंबडी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका कोंबडी विकणार्‍या माणसाने एका कुंपणात काही कोंबड्या बाळगल्या होत्या. त्यातील एक तरी कोंबडी मारून खावी म्हणून एक कुत्रा बरेच दिवस टपून होता. परंतु त्या कोंबड्या कुंपणाबाहेर कधीच येत नसत, त्यामुळे त्याचा काही उपाय चालेना. मग त्याने एक युक्ती केली. कुंपणाच्या फटीत तोंड घालून तो त्यांना म्हणाला, 'अरे, उंदीर आणि घुशी तुमची अंडी खातात म्हणून तुम्ही नेहमी काळजीत असता, त्यापेक्षा मला जर तुम्ही आपल्या कुंपणात राहू द्याल तर त्या दुष्ट प्राण्यांपासून तुमच्या अंड्यांचं मी रक्षण करीन.' कोंबड्यांना ते खरे वाटले आणि त्यांनी कुत्र्याला आत येऊ दिले. एकदा आत प्रवेश मिळताच कुत्र्याने कोंबड्या मारून खाण्याचा सपाटा चालविला, तेव्हा कोंबड्याचे डोळे उघडले. त्या एकमेकींना म्हणू लागल्या. ' हे आपल्याच मूर्खपणाचं फळ ! दुसर्‍याला नावं ठेवण्यात काय उपयोग ?'

तात्पर्य

- अविचाराने आपले सर्वस्व जे शत्रूच्या स्वाधीन करून बसतात त्यांना त्याचा लवकरच पश्चात्ताप करण्याची वेळ येते.

« PreviousChapter ListNext »