Bookstruck

लांडगे आणि बोकड

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पूर्वी एकदा लांडगे व बोकड यांची फार दिवस लढाई चालली होती. वास्तविक पाहता लांडग्यांनी बोकडांचा पहिल्याच दिवशी पराभव करून त्यांचा फन्ना उडविला असता, परंतु बोकडांच्या बाजूस जे कुत्रे होते त्यांच्यापुढे त्यांचे काही चालेना. शेवटी तहाची वाटाघाट होऊन, उभयपक्षी असे ठरले की, लांडग्यांनी आपली पोरे बोकडांच्या स्वाधीन करावी व बोकडांनी आपले कुत्रे लांडग्यांच्या ताब्यात द्यावे. मग ह्या अटी अमलात येताच बोकडांकडे गेलेल्या लांडग्यांच्या पोरांनी आपल्या आयांसाठी ओरडाओरडा केला. तो ऐकताच लांडगे धावून आले आणि बोकडांना म्हणाले, 'दुष्टांनो, आमच्या पोरांना मारून तुम्ही तह मोडला, तेव्हा लढाईला तयार व्हा.' इतके बोलून ते बोकडांवर तुटून पडले व बोकडांजवळ कुत्रे नसल्यामुळे ते सगळे सहज मारले गेले.

तात्पर्य

- शत्रूशी सख्य करताना ज्या वस्तूवर आपली सुरक्षितता अवलंबून असेल अशा वस्तू त्यांना कधीही देऊ नयेत.

« PreviousChapter ListNext »