Bookstruck

साळुंकी आणि इतर पक्षी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक शेतकरी शेतात तागाचे बी पेरीत होता, ते पाहून एक साळुंकी इतर पक्ष्यांना म्हणाली, 'अरे, तुम्ही जर मनावर घ्याल, तर आपण हे बी उकरून याचा नाश करून टाकू. करण हे बी रुजून त्याची जी झाडे होतात, त्यांच्या दोरांनी पारधी लोक जाळी करतात नि त्या जाळ्यांत सापडून आपण आपल्या जीवाला मुकतो.' हे ऐकून सर्व पक्ष्यांनी त्या साळुंकीची टर इडविली. नंतर काही दिवसांनी ते बी रुजून त्याची रोपे आली, तेव्हा साळुंकीने ती उपटून टाकण्याची सूचना पुन्हा एकदा पक्ष्यांना केली. परंतु त्या वेळीही 'ही मोठी भविष्यवादी आली आहे', असे म्हणून पक्ष्यांनी तिचा उपहास केला. मग ज्यांना आपल्या हिताची गोष्ट दुसर्‍याने सांगितली असताही कळत नाही, अशा अविचारी प्राण्यांच्या संगतीत राहून आपला जीव धोक्यात घालण्यापेक्षा त्यांची संगत सोडलेली बरी, असा विचार करून ती साळुंकी पुढे माणसांच्या वस्तीत येऊन राहिली.

तात्पर्य

- आपल्या जातीच्या लोकांना हिताची गोष्ट सांगावी, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते बजावल्यावर त्या गोष्टीकडे जर ज्ञातिबांधवांनी लक्ष दिले नाही व त्यामुळे नाश होणार हे जर स्पष्ट दिसत असेल तर त्यांच्या बरोबर आपला नाश करून घेण्यापेक्षा त्यांची संगती सोडून द्यावी हे अधिक इष्ट होय.

« PreviousChapter ListNext »