Bookstruck

गाढव आणि त्याची सावली

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका प्रवाशाने द्‍र परदेशी जाण्यासाठी एक गाढव भाड्याने घेतले. वाटेने जात असता, ते दिवस उन्हाळ्याचे असल्याने उन्ह फार कडक लागू लागले. म्हणून गाढव उभे करून तो प्रवासी खाली उतरला आणि उन्ह टाळण्यासाठी गाढवाच्या सावलीत बसू लागला. तेव्हा गाढवाचा मालक तसे करू देईना. त्यावरून दोघांचे भांडण सुरू झाले. मालक म्हणाला, 'मी तुला गाढव भाड्याने दिलं आहे, त्याची सावली नाही.' प्रवासी म्हणाला, 'गाढवाबरोबर मी त्याची सावलीसुद्धा भाड्याने घेतली आहे.' त्यांचा वाद वाढत शेवटी प्रकरण हातघाईवर आले. तेवढ्यात ते गाढव तेथून पळून गेले. ते पाहून दोघांनाही कपाळाला हात लावून बसावे लागले.

तात्पर्य

- जगातील व्यवहारात माणसे छायेसाठी भांडून मूळ तत्त्वाला मुकतात.
« PreviousChapter ListNext »