Bookstruck

गरुड आणि मांजर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक गरुड आकाशात उंच उडत असता खाली जमिनीवर एक ससा बसला आहे असे त्याला वाटले. तो खरच ससा आहे की काय हे पाहण्यासाठी त्याने त्या प्राण्यावर झडप घातली व त्याला पकडून खाण्यासाठी तो पुन्हा आकाशात उडाला नाही तोच त्याला असे आढळून आले की, आपण मोठी चूक केली. आपण जो प्राणी पकडून आणला आहे तो ससा नसून मांजर आहे. कारण त्या मांजराने गरुडाच्या गळ्याला मिठी मारून आपल्या भयंकर पंजाने गळा दाबण्यास सुरुवात केली होती व काही वेळाने त्याने गरुडास ठार मारून जमिनीवर पाडले.

तात्पर्य

- अधाशीपणे व घाईने केलेल्या कामाचा बर्‍याच वेळा भयंकर परिणाम होतो.
« PreviousChapter ListNext »