Bookstruck

गीता हृदय 45

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हे सारें गुह्यतम असें शास्त्र तुला सांगितलें. गीताशास्त्र जणुं येथें संपलें.

पंधराव्या अध्याय कर्म, ज्ञान यांची एकरूपता सांगत आहे.

कर्माची साधनें, जीव, परमात्मा सारें पुरूषमय, सारें परमैक्य. कर्म भक्ति, ज्ञान हीं निराळी नाहीत. कर्म म्हमजेच भक्ति, भक्ति म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच कर्म. सारखी एकमेकांत मिसळावयाची. ख-या कर्मांत भक्ति व ज्ञान असणारच. ख-या भक्तीत कर्म व ज्ञान असणारच. ख-या ज्ञानांत कर्म व भक्ति ही येणारच. या वस्तू एकरूप आहेत. फुलाच्या पाकळी पाकळीत गंध व रंग अविनाभावें असतात, त्याप्रमाणें आपल्या कर्मांत भक्ति व ज्ञान यांचा गंध व रंग हवा. जीवनात कर्म व भक्ति यांचा रंग व गंध हवा. दुधांत ज्याप्रमाणें साखर व केशर आफम घालतों त्याप्रणाणें आपण कर्म, भक्ति व ज्ञान ही एकरूप करूं या.

असें हे गीताशास्त्र आहे. हा धन्यतम पुरुषोत्तमयोग आहे.

अध्याय १६ वा

पंधराव्या अध्यायाच्या शेवटी गीताशास्त्र सांगितलें असा उल्लेख आहे. सोळाव्या व सतराव्या अध्याय हे परिशिष्टरूप आहेत. अठरावा अध्याय म्हणजे उपसंहार आहे.

या सोळाव्या अध्यायांत दैवी व आसुरी संपत्तीचें वर्णन आहे. जगाच्या आरंभापासून निरनिराळ्या स्वरूपांत गा झगडा चालला आहे. सर्व धर्मांतून हें द्वैत सांगितलें आहे. ख्रिश्चन धर्मांत सैतान व परमेश्वर यांचा अखंड झगडा आहे. पारशी धर्मांत तेच आहे. येथे गीता तेंच उभे राहणार हा प्रश्न आहे. अशा झगड्यांतूनच जगाची प्रगति होत आली आहे. विरोधांतून विकास होत आहे. पाऊल पुढे पडत आहे.

दैवी गुणांच्या आरंभीच अभय या गुणाला स्थान दिलें आहे. आणि शेवटी नम्रता, नातिमानिता हा गुण सांगितला आहे. अभयाशिवाय प्रगति नाही. परंतु नम्रताहि दवी. सायकलला जसा ब्रेक असतो तसा नम्रतेचा ब्रेक हवा. म्हणजे नीट पाऊल पुढें पडेल.

« PreviousChapter ListNext »