Bookstruck

जगन्नाथ 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“मद्रास रडवते सर्वांना.”

“हसवते सुद्धां, आनंदविते सुद्धां.”

“घ्या ही लवंग. व्रत नाही ना.”

“माझें व्रत नाही. मी विडासुद्धा खातो.”

“तुम्हांला आवडतो? तुम्हांला जरूर नाही म्हणा!”

“कां?”

“अहो पुष्कळ लाक ओंठ रंगविण्यासाठी विडा खातात. ओठ लाल दिसावे म्हणून. विक्षिप्त लोक!”

“चला. नाहीतर गच्चीतच बोलत उभी राहूं व रात्र संपून जाईल.”

“तरी तुम्हांला कंटाळा नाही येणार?”

“संगीताचा मला कंटाळा येत नाही. गाणारे झोपेवर विजय मिळवितात. रात्र म्हणजे त्यांचा जणुं दिवस.”

दोघे गेली, हरिजनवस्तींत गेली. तेथे एक मोठे झाड होते. त्या झाडाखालीच ही रात्रीची शाळा भरे.

“या झाडाखालीच का शाळा?”

“हो. देवाची शाळा.”

“परंतु पावसांत?”

“एक हरिजनाश्रम बांधला जात आहे. तेथे पुढे आम्ही जमत जाऊं.”

“कोण बांधतो आहे आश्रम?”

“बाबाच. माझ्या आग्रहाने बांधीत आहेत. माझ्या हिंदी वर्गांचे उत्पन्न मी त्यालाच देणार आहे.”

« PreviousChapter ListNext »