Bookstruck

*कलिंगडाच्या साली 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

असें म्हणून त्यानें तिचे डोळे पुसले. दोघें तेथें होती. चांदणें पडलें होतें. दूर कुत्री भुंकत होतीं. पुन्हा शुक्रीला हुंदका आला.

“अग, झाले काय तुला रडायला?”
“तुम्हांला एक सांगावयाचं आहे.”
“काय ?”
“तुम्हीं ऐकाल?”
“ऐकेन.”
“तुम्हीं आठपंधरा दिवस कुठं तरी चालते व्हा.”
“का?”
“म्हणजे मी नीट बाळंत होईन. तुम्ही याल तेव्हां घरांत बाळ असेल.”
“माझी का तुला भीति वाटते?”
“होय.”
“आणि इथं तूं एकटी राहाशील ?”
“राहीन.”
“कोणी धनजी आला तर!”
“त्याचा प्राण घेईन.”
“त्या वेळेसहि आठवण राहील असा कडकडून चावा त्याला मी घेतला होतास दुष्ट. पाजी.”
“शुक्री, मी खरंच का जाऊं?” तुझ्या पोटांत कळा येतील.” कोण धीर द्यायला?”   
“तुला मुलगा होईल की मुलगी?”
“मी काय सांगू?”
“त्याचा रंग कसा असेल ? काळा कीं गोरा?”
“आपण दोघं काळीं आहोंत.”
“शुक्री, मी जाऊं?”
“जा.”

आणि खरेंच मंगळ्या निघून गेला. त्या जंगलांत शुक्री एकटी होती. रात्र गेली. दुसरा दिवस उजाडला. ती झोपडींत होती. कांहीं कंद शिजवून तिनें खाल्ले. पाल्याची भाजी करून तिनें खाल्ली. शेळीबकरीचें जणुं जीवन!

« PreviousChapter ListNext »