Bookstruck

आपण सारे भाऊ 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘कृष्णनाथ तुझा आहे. देवाच्या दयेने काही कमी नाही. प्रेमाने नांदा.’

‘कृष्णनाथची काळजी नको.’

‘ती गेली. मी जातो. राम....’

श्रीधरपंतांनी डोळे मिटले.
‘बाबा, गंगा.’

ओठ जरा हलले. थेंब पोटात गेला. कृष्णनाथ दोन फुले घेऊन आला.
‘बाबा, हे घ्या फुल, कसे छान फुलले आहे.’
‘ठेव तेथे, बाळ.’

‘दादा, बाबांना झोप लागली आहे?’

‘हो.’

‘मी हे फूल आईला नेऊन देतो.’

‘आई झोपली आहे.’

‘मी हळूच तेथे ठेवीन. आईला उठवणार नाही.’

कृष्णनाथ गेला. आईच्या उशाशी हळूच त्याने फूल ठेविले. आईबापाची शेवटची भक्तिप्रेममय पूजा त्याने केली. कृष्णनाथ अनाथ झाला.

« PreviousChapter ListNext »