Bookstruck

आपण सारे भाऊ 26

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कृष्णनाथ धावत आला. आज किती तरी दिवसांनी तो आनंदी होता. त्याचा चेहरा सुंदर दिसत होता.
‘काय वैनी?’

‘हे ताट खाली नेऊन ठेव जा.’

कृष्णनाथ ताट घेऊन खाली गेला.
‘हा का मुलगा?’

‘हो.’

‘चपळ व उत्साही आहे. दिसतोही सुंदर. खरेच का त्याला नेऊ?

आम्हांला अशी मुले हवीच आहेत. नवीन कामे शिकवायची आहेत. मी तुमच्याकडे त्याचा पगार पाठवून देत जाईन. तुमचा दूरचा नातलग आहे वाटते?’

‘हो.’

‘पाहा, ठरवा.’

‘तुम्हाला हा मुलगा दिला. तुम्ही त्याचे काहीही करा. ज्या दिवशी तुमची सर्कस येथून जाणार असेल त्या दिवशी तुम्ही या. तुमच्या मोटारीत तुमच्याबरोबर तो व मी बसू, मी वाटेत पुढे उतरेन. तुम्ही त्याला घेऊन जा.'

‘तुम्हांला काय देऊ? काय पाठवीत जाऊ?’

‘तुमच्या मनाला वाटेल ते पाठवीत जा, आधी काम तर नीट शिकू दे.’

‘काम शिकवताना कधी रागे भरावे लागते, मार द्यावा लागतो.

‘अहो, शाळेत नाही का मास्तर मारीत? घरी नाही का आईबाप मारीत? ते चालायचेच.’

‘ठरले तर. येतो आता.’

‘अच्छा!’

« PreviousChapter ListNext »