Bookstruck

आनंदी आनंद 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘आधी माझ्याकडे सारे चहा घ्या.’ हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले.

‘डॉक्टर, तुमचे उपकार. तुम्ही बाबांची काळजी घेतलीत.’ चित्रा डोळे भरून येऊन म्हणाली.

डॉक्टरांकडे चहा होऊन चित्रा, बळवंतराव दत्तमंदिरात आली. आमदार हसन व गोविंदराव मुंबईस गेले.

बळवंतरावांनी मोठा सत्यनारायण केला. सा-या गावाला प्रसाद वाटण्यात आला.

‘चित्रा, आपण जाऊ.’

‘चला.’

‘परंतु माझी आई आहे हो.’

‘पुत्रशोकाने त्यांचा पुनर्जन्म झाला असेल. किती झाले तरी मातृहृदय ते. चला जाऊ. मला भीती नाही वाटत आणि तू जवळ आहेस. खरे ना?’ सर्वांचा निरोप घेऊन चित्रा व चारू आपल्या गोडगावला आली. रात्रीची वेळ होती.

‘आई! चारूने हाक मारली.

‘आल्ये रे, चारू आला!’ आईने हाक दिली. ती धावत आली. कढी काढण्यात आली.

‘दारात उभी राहा. मीठमोह-या टाकते हो.’ असे म्हणून माता घरात गेली. मीठमोह-या घेऊन आली. त्या ओवाळून टाकण्यात आल्या. मुलगा व सून घरात आली. वृद्ध पिताही उठून खाली आला.

‘बाबा, पाया पडतो.’ चारू म्हणाला.

‘मामंजी, नमस्कार करत्ये.’ चित्रा म्हणाली.

‘जन्मसावित्री हो. पुत्रवती हो.’ सासरा सकंप म्हणाला.

« PreviousChapter ListNext »