Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 103

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

११५

चार्ली-चॅपलीन हा सा-या जगाला हसवणारा. बोलपटात काम करणारा. तो गरिबीतून वर आला नि गरिबांतच राही. गांधीजींची व त्याची भेट झाली.

‘तुम्ही यंत्रांविरुद्ध का?’ – चार्लीने विचारले.

‘देशात कोट्यावधी बंकार. कोणता देऊ धंदा? म्हणून चरखा दिला.’

‘फक्त कपड्यांसाठी ग्रामोद्योग?’

‘अन्न आणि वस्त्र या बाबतीत प्रत्येक राष्ट्र स्वावलंबी हवं. आम्ही होतोही. परंतु इंग्लंडमध्ये यंत्रांमुळं प्रचंड उत्पादन होऊ लागलं. ते खपविण्यासाठी बाजारपेठा शोधू लागले. भारताची बाजारपेठ बळकावून आमचं शोषण तुम्ही चालवलंत. असं इंग्लंड जगाच्या शांतीला धोका नाही? उद्या हिंदुस्थानसारखा प्रचंड देश जर प्रचंड यंत्रांनी उत्पादन करू लागला तर तो जगाला केवढा धोका होईल!’

‘परंतु धनाचं नीट वाटप केलं, कामाचे तास कमी केले, कामगारांना अधिक विश्रांती मिळून ते विकासात वेळ दवडू लागले तर दुस-यांना गुलाम करून बाजारपेठा ताब्यात घेण्याची काय जरूर? तरीही तुमचा यंत्राला विरोध राहील का?’

‘नाही.’

« PreviousChapter ListNext »