Bookstruck

मृत्यूपश्चात

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
पुराणात सांगितल्यानुसार जेव्हा एखादा मनुष्य मृत्यू पावतो किंवा आत्मा शरीर त्याग करून पुढील यात्रेस सुरूवात करतो तेव्हा त्याला तीन मार्ग असतात. त्यापैकी तो आत्मा कोणत्या मार्गावरून जाईल हे फक्त त्यांच्या कर्मांवरून ठरतं.
अर्ची मार्ग, धूम मार्ग आणि उत्पत्ती विनाश मार्ग. अर्ची मार्ग ब्रह्म आणि देवलोकाच्या यात्रेसाठी असतो, धूममार्ग पितृलोकाच्या यात्रेसाठी आणि उत्पत्ती विनाश मार्ग नर्कात जाण्यासाठी असतो.
 
तरी, कोणत्याही मार्गाने गेलेल्या आत्म्याला काही काळ वेगवेगळ्या लोकांत रहायल्या मिळाल्यानंतर पुन्हा मृत्यूलोकातच यावं लागतं. बहुतांश आत्म्यांना इथूनच जन्म घेऊन, मृत्यू पावून पुन्हा इथेच येऊन पुढचा जन्म घ्यावा लागतो.
यजुर्वेदात असं सांगितलं आहे की जे तप-ध्यान करतात ते शरीर सोडल्यावर ब्रह्मलोकात जातात आर्थात ब्रह्मात विलीन होतात. काही सत्कर्म करणारे भक्तगण स्वर्गात जातात. अर्थात ते देव होतात.  राक्षसी कामं करणारे प्रेतयोनित अनंतकाळासाठी भटकत रहातात आणि काही पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात. जन्म घेतानाही माणसाचाच जन्म मिळेल हे नक्की नाही. याआधी सगळेच यमलोकात रहातात जिथे त्यांचा न्यायनिवाडा होतो.
« PreviousChapter ListNext »