Bookstruck

डिंग्को सिंह

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/34/Ngangom_Dingko_Singh_at_the_13th_Asian_Games.jpg/220px-Ngangom_Dingko_Singh_at_the_13th_Asian_Games.jpg

डिंग्को सिंह एक भारतीय मुष्टीयोद्धा होते ज्यांनी १९९८ च्या आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. ते मणिपूरचे आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९७९ रोजी मणिपूरच्या एका दुर्गम भागातील गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. त्यांना आपल्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच अनेक समस्यांचा सामना करावा लागला आणि त्यांचे पालन पोषण एका अनाथाश्रमात झाले.
ते १९९७ मध्ये बैंकॉक मध्ये किंग्स कप जिंकले. १९९८ च्या बैंकॉक आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकले. गान्गिम डिंग्को सिंह, ज्यांना सामान्यतः डिंग्को सिंह नावाने ओळखले जाते, एक भारतीय मुष्टीयोद्धा आहेत आणि देशात जन्माला आलेल्या आतापर्यंतच्या सर्वश्रेष्ठ मुष्टीयोद्ध्यांत त्यांचे नाव घेतले जाते, १९९८ मध्ये बैंकॉक आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली.
भारतीय क्रीडा प्राधिकरण द्वारे सुरु करण्यात आलेल्या विशेष क्षेत्र खेळ योजनेच्या प्रशिक्षकांनी डिंग्को मधले सुप्त गुण ओळखले आणि मेजर ओ. पी. भाटीया यांच्या विशेष निगराणीखाली त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मेजर भाटीया पुढे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे टीम शाखा निर्देशक बनले होते. डिंग्कोची प्रतिभा, प्रयत्न, मेहेनत आणि प्रशिक्षणाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती आणि वयाच्या केवळ १० व्या वर्षी १९८९ साली त्यांनी अंबाला इथे आयोजित करण्यात आलेल्या जुनियर राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत विजय संपादन केला होता. या विजयाने निवडकर्ते आणि प्रशिक्षक यांचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले. त्यांनी त्याला भारताचा एक उभारता मुष्टीयोद्धा तारा या रूपात पाहण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध क्षेत्रात त्यांनी सन १९९७ मध्ये पहिले पाऊल ठेवले आणि १९९७ मध्ये बैंकॉक, थायलंड मध्ये आयोजित किंग्स कप पाध्ये विजय मिळवला. स्पर्धा जिंकण्याच्या व्यतिरिक्त त्यांना स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ मुष्टीयोद्धा देखील घोषित करण्यात आले. मुष्टियुद्धाच्या खेळातील त्यांची उत्कृष्टता आणि आपल्या सततच्या मेहनतीने आणि समर्पणाने देशासाठी त्यांनी दिलेले असाधारण योगदान यासाठी १९९८ मध्ये त्यांना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

« PreviousChapter ListNext »