Bookstruck

बाल मजूर... - अदिती जहागिरदार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
त्याच्या पाठीवर वळ उठलेले असतात...
कमरेवर फाटकी, मळकी चड्डी...
उन्हातान्हात पोळून निघालेले
लहानसे काळे शरीर...

त्याच्या हातात लाचारीने
कधीच दिलाय् झाडू...
माजोरड्यांची शिते साफ करण्यासाठी!
त्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर,
हे क्रूर आयुष्य वेचण्यासाठी!

गुळगुळीत काचांच्या पलिकडे असतो एल्. सी. डी.
त्यावर 'बाल हनुमान' चोरून पाहत
उभा असतो तो...
त्याच्या गदेत आणि माझ्या गदेत
इतका फरक का..?
हाच विचार त्याला सतावत राहतो...

त्याला पुन्हा पाठीवरचे वळ आठवतात...
आणि
त्याच्या छातीत धस्सss होतं...
त्याची अशक्त गदा घेऊन
तो पुन्हा झाडायला लागतो...
« PreviousChapter ListNext »