Bookstruck

शंका..? - निलेश रजनी भास्कर कळसकर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
त्यांनी दाभोळकर मारले.. पानसरे मारले..
आज मारतील.. उद्या मारतील..
मारू दे सालं माझं काय गेलं..
त्या धर्मद्रोह्यांनी माझा धर्म बुडवला होता..
ते सांगत सुटले होते..
माणसाने माणसारखे जगावे...
ते स्त्री ला समान अधिकार द्यावे...
हे सांगत सुटले होते..
अनिष्ट प्रथा सोडा...
तो पानसरे खरां शिवाजी सांगत सुटला होता..
माझा मुस्लिमद्रोही शिवाजी संपत होता..
बरं झालं मारले ते..
हे माझा धर्म बुडवायला निघाले होते..
जातपंचायत संपवातो दाभोळकर सांगत होता..
भारतीय संविधान अंगीकारा सांगत सुटला होता..
माणसाने माणुसकीने वागावे सांगत सुटला होता..
कसं मारलं ना..
बंदूक ची गोळी मेंदूत शिरली होती..
रक्ताचा पाट वाहत होता..
माझा धर्म बुडवायला निघाले होते..
आज मी धर्म सांगत आहे..
स्त्री ही गुलाम आहे..
बळी दिला पाहिजे...
शिवाजी हिंदू चे होते..
पण मी हे सांगताना भीत आहे..
असे का होत आहे..??
मी तर या धर्मद्रोह्यांना संपवले..
पण हे मेले काय?
« PreviousChapter ListNext »