माझ जीवन अनुभव क्र तीन
हाजीअली येथे अपंग हास्पीटल मध्ये मला वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक सराव करावा लागला त्यामुळे मला थोडे फार धरुन धरुन उभे राहता येऊ लागले नंतर भिंतीला धरून चालू लागलो कुल्र्याची खोली सोडून आम्ही भायखळा येथे पुर्व बाजू सुंदर गल्ली पोट मळ्यावर एकदम लहानशी खोली भाड्याने घेऊन राहू लागलो खोली मध्ये दिवसा सुद्धा अंधार असायचा पोट मळ्यावर जाण्यासाठी एक चिढी लावलेली होती पाणी सकाळी सकाळी येत त्यामुळे सर्वांची धादड उडत दोन मजली इमारत होती दोन मजली चढुन पाणी वर जाण्यासाठी वडिल दोन भाऊ बहिण मदत करत आई अंगात ताकद नसल्याने तिला कोणी त्रास देत नसत कपडे वैगेरे धुण्यासाठी खाली नळावर जावं लागत ह्या सर्व गडबडीत वडीलांना (दादा) कामाला जाणण्यासाठी उशीर होत माझं दोन भाऊ आणि बहीण ही बारा ते सहा वाजेपर्यंत दादरला बालमोहन विद्यामंदिर मध्ये शिकत असत पोट मळा असल्याने मला खाली येता येत नव्हते आई मला सांभाळत असत आईची फक्त स्वयपाकाची जबाबदारी सोपविण्यात आली होती सर्वांचे हाल होत असल्याने आम्ही जेमतेम सहा महिने कसेतरी काढलं नंतर आम्ही माझगाव हाथीबाग चव्हाण बिल्डिंग येथे राहायला आलो