माझं जीवन अनुभव क्र चार
चव्हाण बिल्डिंग ही दोन मजली इमारत आहे आम्ही पहिल्या मजल्यावर खोलीत राहत होतो तिथे सार्वजनिक नळ होता प्रत्येक मजल्यावर एक नळ पाणीपुरवठा दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत प्रत्येक मजल्यावर चार खोल्या पहिल्या खोलीत राहणारे आम्ही राहयला गेल्यावर दोन तीन दिवसांनी ते खोली सोडून गेले म्हणुन त्याचं नाव माहिती नाही नंतर त्या खोलीत बिरमोळे आडनाव चे कुटूंब राहण्यासाठी आलं पहिल्या खोलीत ते आणि दुसऱ्या खोलीत माळी व तिसऱ्या खोलीत आम्ही (रसाळ) शेवटच्या खोलीत डॉक्टर सुर्यवंशी राहत दोन खोल्या त कोकणी आणि घाटी दोन खोल्या त राहत होतो पाणी आले म्हणजे सर्वांची तारांबळ उडत असतं त्यामुळे थोडीफार बाचाबाची होत जास्तच काही झोंबाझोंबी झाली की एक दोन दिवस अबोला होयचा नंतर गळ्यात गळा घालून बोलला लागे असे गोडीगुलाबीने चालेल असं सगळी माणसे मनमिळावू स्वभावामुळे एक प्रकाचा घरोबा निर्माण झाला होता दुपारी बायका काय हो काय कराताय घरातील सर्व कामे झाली का जरा गप्पा मारायला या बिरमोळीण ह्या कधी कोणा बरोबर मिसळत नसे ती स्व:ताला काही तरी वेगळे च समजत असे