
माझं जीवन अनुभव क्र दोन
by Anonymous
माझ्या आईला दोन मुले आणि एक मुलगी झाली होती अन्न नलिका बसविण्यात आली अंगात अशक्त फारच होता शरीरात ताकद भरुन निघण्यासाठी कमीत कमी एक दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे माझं आजोबा आजी वडीलांना याबाबत म्हणाले की तू बाबा तुझी बायको तुझ्या जवळ राहून देत तिचा योग्य प्रकारे देखभाल कर वडीलांनी आईला मुंबईत घेऊन आले त्यांनी कुल्र्याला मित्राच्या मदतीने मॅच फाॅक्टरी लेनला एक लहानशी भाड्याने घेऊन राहू लागले त्यादरम्यान आईला दिवस गेले आई अशक्त असल्याने ती साडे आठ महिन्यांत डिलेवारी झाली आणि माझा जन्म झाला मी पण अगदी लहान अशक्त असल्याने काचेच्या पेटीत ठेवण्यात आले डॉक्टरांनी सांगितले की मुलांची वाढ बरोबर झाली नाही ते जगेल की नाही सांगता येत नाही परंतु माझ्या भाग्याची दोरी भक्कम होती पण दोरी भक्कम असुन काय फायदा मी लुळापांगळा झालो मला चालता येत नव्हते मान एका बाजूला सारखी पडायची तोंडातून लाळ गळायची असा अवशेद्य सुध्दा त्यांनी मला साभाळे मी सहा सात वर्षांचा झाल्यावर कोण्याच्या वरुन मला हाजीअली येथे अपंग हास्पीटल दाखवण्यात आले









