Bookstruck

माझं जीवन अनुभव क्र पाच

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

मला पण बालमित्र मिळाले पहिल्या खोलीतील नितीन आणि मी  दुसऱ्या मजल्यावर चे अरुण आणि बाळू  लहानपणी मी अशक्त असल्याने माझे नाव ठेवले नव्हते सगळे मलाही बाळू ह्या नावाने ओळखले जात वयाने  मित्रांमध्ये मी मोठा होतो  आता मी भिंतीला धरून चालू लागलो गॅलरीत धरुन धरुन चालत असे मी  झाल्यापासून आमच्या परिस्थिती सुधारली होती दादांनी (वडिल) माझगाव ला  आंबेवाडी मध्ये एक दुकान घेतलं आता वडिलांच्या हाताखाली दहा बारा माणसं काम  करु  लागले मी हाजीअली येथे जायचं बंद केले मी  माझ्या  मित्रांबरोबर खेळत असत दादांनी मला माझगावच्या  पोस्टाच्या शाळेत नाव  घातलं शाळा पोस्टा  जवळ होती म्हणून तिला पोस्टाची  शाळा म्हणत  माझं जास्त असल्याने मला शाळेत मध्ये पहिलीची परिक्षा देण्यात आली आणि एकदम दुसरीत इयत्तेत  घेतला अशा  रीतीने मी चौथीत गेलो  पण मला आईला व  दादांना  शाळेत पोचविणे आणने  त्रासाचं होऊ लागले मला गावी आजी-आजोबा कडे पाठवले दादांनी आजोबा आजी सांगितले की मी तुम्हाला महिन्यातुन एकदा मनीअॉडरने  पैसे पाठवतो तुम्ही बाळूला शाळेत नाव घालुन आयुवेर्दिक औषधे देऊन सुधारणा होते का पहा

« PreviousChapter List