Bookstruck

आम्ही तो जातीचे आहेती महा...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आम्ही तो जातीचे आहेती महार । तुम्हीं तो थोर उंच वर्ण ॥१॥

अन्नपाणी देता निंदितील जन । करतील ताडण मजलागीं ॥२॥

ऐंकोनियां मात येरू बोले वचन । यातीसी कारण नाही मज ॥३॥

माझा तूं वाचवी अन्न देऊनि प्राण । पुढील कारण पाहूं नको ॥४॥

ऐकोनी उत्तर सोयरा उठली । घरामध्यें आली लवलाहीं ॥५॥

दही आणी भात घेतला वाटीभरीं । आणोनिया करीं दिला तिने ॥६॥

वंका म्हणे हरी खावोनी तुष्टला । म्हणे माग मला देतों तुज ॥७॥

« PreviousChapter ListNext »