2014 सालच्या निवडणुकीच्या अगोदर व्यापारी वर्ग मोदी मोदी करत होते.तेच व्यापारी 2014 ला निवडणूकी झाल्यावर मोदीने GST & नोटा बंदी केली त्यामूळे विरोधी सरकार व व्यापारी सर्वात जास्त नाराज होते,परंतु शेतकरी नाराज झाले नाहीत ही लक्षात घेण्याची बाब आहे.
मी सध्या गेल्या 10 महिन्यापासून मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे येथे दिवाणजी म्हणून जॉब करत आहे. कामाच्या पहिल्याच दिवसापासून आजपर्यंत म्हणजेच 1फेब्रुवारी 2019 सकाळी 11वाजेपर्यंत व्यापारी वर्ग मोदीच्या विरोधामध्ये बोलत होते. ते व्यापारी वर्ग सकाळी 11नंतर मोदी मोदी करायला लागले याचा देशातील जनतेने लक्षात घेण्यासारखे आहे. जर याचा गांभीर्याने विचार केला तरच आपल्या देशामध्ये शेतकरी वाचु शकेल.
खरोखरच व्यापारी वर्ग किती लालसी आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.
कारण,
व्यापारयांसाठी व्यवसायामध्ये मोदीने 2.5 लाखावरुन 5 लाख रुपये करमुक्त उत्पन्नाची घोषणा केली. या वरुण असे दिसुन येते की व्यापारी वर्ग दोन्ही दरडीवर हात ठेऊन आहेत.