@भ्रष्टाचारी व्रुत्ती@
आज जर बघायच झाल तर अस कोणतच ठिकाण उरल नाही जिथे भ्रष्टाचार होत नाही.प्रत्येक ठिकाणि तो वाढतच चाललेला आहे .याला जबाबदार कोण सामान्य जनता की सरकार .? कोणतेही सरकारी काम करायच झाल तर प्रत्येक अधिकारी आपली झोळी पसरुन बसलेले असतात त्यांना चहापाणि जर नाही दिले तर आपले काम होणारच नाही.अन जर येथे पैसे दिले तर त्याच्यावरचा अधिकारी पण टपुन बसलेला च असतो.
आत्ता या भ्रष्टाचाराच्या चौकटीत सामान्य लोकांचे फार हाल होतात .त्यांचे काम पण काय असते जिवन जगण्यासाठी एखादी सरकारी योजना हवी असते.ती पण सहज मिळत नाही.अन ज्यांना याची गरज नाही ते लोक माञ पैसे देउन आपल्या पोळ्या भाजुन घेतात .या संघषाॆत गरिब हा अजुन गरिब व श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चाललाय.मग यात मोठे पुढारी ही सामील असतात जे मतदानाच्या वेळी ईलाज नसताना जनतेने पैसे घेउन निवडुन दिलेले असतात अस कधीपयॆंत चालनार.
जनता प्रत्येक नेत्याला निवडुन देत असते कारण त्यांनी लोकांसाठी सोयीसुविधा आणाव्यात आणि तस होतेही अनेक योजना येतात पण कागदावरती च येउन दम तोडतात कारण पैसे तर गायब केलेले असतात काही योजना आल्या तरी गरिब लोकांना सांगीतले जात नाही .आणि लोक त्यांना विचारतच नाहीत कारण त्यांना उद्याच्या जेवणाची तयारी करायची असते त्यांच्याकडे वेऴ कोठे आहे .या सवॆ गोष्टींचा फायदा मोठे अधिकारी ,नेते घेत असतात पण सगळेच तसे नसतात.पण समुद्रासमोर पाण्याचा एक थेंब काय करणार ...