Bookstruck

@स्ञियांच बिकट जगण@

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

       आज जर बघितल तर असे कोणतेच क्षेञ नाही जेथे स्ञिया काम करत नाहीत.सवॆञ त्या काम करत असताना आपल्याला दिसतात पण काही स्ञिया आजही अश्या आहेत.ज्यांना घरातुन बाहेर ही जाउ दिले जात नाही .काही सामाजिक परंपरा आणि धामिॆक विचारसरणि मुळे असे होते . वरुन आपल्या देशात पुरुष प्रधान संस्क्रुती आहे.त्यामुळे पुरुषांचेच येथे खुप चालते बिचार्या महिला ते सहन करतात.घरात नवर्याने मारले म्हणुन ती कोणाकडे तक्रार करित नाही कारण तिला आयुष्य घालवायच असत पतिबरोबर. पण तुम्ही अस कुठ बघितलय का की नवर्याला बायकोने मारले आणि नवरा शांत बसलाय .नाही अस होउच शकत नाही .कारण दु:ख सोसण्याची ताकद फक्त महिलांमध्ये असते हे पुरुषांनी मान्य केले पाहीजे.
        आज प्रत्येकाला बहिण पाहीजे पण मुलगी नको!बायको पाहीजे पण मुलगी नको!आई पाहीजे पण मुलगी नको.मग या तीन व्यक्ती येणार कोठुन? एका मुलीशिवाय तुमचेतर अस्तीत्व काय आहे.काहीच नाही ना .मग एवढ सगळ कशाला.प्रत्येक बाप मुलगी झाली की जबाबदारी वाढली अस समजतो काही समजत नसतीलही पण आहे विषय असाच आहे.कारण मुलींचे संगोपण निट करायचे असते .पुन्हा तिचे शिक्षण ,लग्न याची काळजी बापाला असते .नशिबाने चांगले स्थळ मिळाले तर ठिक नाहीतर आयुष्यभर मुलगी आई-वडिलांना कोसत बसते.आणि खुप ञास होत असतो याचा मुलीला व घरच्यांना..
        दुसरिकडे तर मुलींचे जगणेच अवघड झालेय कारण एवढे अत्याचार होतात ना की सांगणे ही कठिण आहे.प्रेम प्रकरण त्यात मुलीला अँसिड टाकण्याची धमकी.तसेच लग्नाचे अमिष दाखवुन मुलींचा वापर केला जातो.त्याही पलिकडे मग बलात्कार ,अपहरण असे प्रकार तर रोजच घडतात किती नियत खराब झालेली आहे लोकांची!ते तिन वषाॆची मुलगी व सत्तर वषाॆची म्हातारी बाई ही पहात नाहीत.शिवरायांच्या या महाराष्ट्रात हे घडते आहे .हे पाहुन असे वाटते की हा तोच महाराष्ट्र आहे ना ज्याला संतांची भुमी म्हणुन ओळखले जाते.

« PreviousChapter ListNext »